परिचय

मातृवाणी—अम्मांची वाणी—माता अमृतानंदमयी मठाचे प्रमुख प्रकाशन.
 
सन् 1984 मध्ये अम्मांच्या जन्मदिन प्रसंगी, भक्तांपर्यंत अम्मांचा उपदेश पोहोचविण्यासाठी, प्रथम प्रकाशित झालेली मातृवाणी जगभरातील लाखो लोक वाचतात.
 
वर्गणीदारांची संख्या वाढली असून जगातल्या सर्व देशांत प्रचार झाला असून जगभरात अम्मांचा वाढत चाललेल्या प्रभावाचे हे निदर्शक आहे.
 
मासिकाच्या वाढत्या आकर्षणाचे रहस्य स्वतः अम्माच आहे. निःस्वार्थ प्रेम व कारुण्याची मूर्तरूप असलेल्या अम्मांचा उपदेश अत्यंत साधा, सोपा, पवित्र, गंभीर विश्वव्यापी, प्रासांगिक व कालातीत आहे.
 
या सर्व उपदेशाबरोबरच मातृवाणीची पाने भक्तिभावाने ओतप्रोत अनुभव, स्मरणकथा व लेखांनी भरलेली असतात, प्रत्येक अंकात अम्मांच्या विश्वव्यापी यात्रांचे वार्तांकनही असते. तसेच मठाद्वारे संचालित विशाल धर्मार्थ कार्यांची माहिती असते.
 
सध्या मातृवाणी १6 भाषांमध्ये प्रकाशित होते. यात ९ भारतीय भाषा (मल्याळम,तमिळ,कन्नड़,तेलुगु,हिन्दी,मराठी,गुजराती,बंगाली व उड़िया) आणि 7 परदेशी भाषा (इंग्रजी, फ़्रेंच, जर्मन, स्पैनिश,इटालियन,फ़िन्निश,जापानी) आहेत.
 
गत तीन दशकांपासून ईश्वरीय संदेशवाहिनी असलेल्या या मासिक पत्रिकेचे भावी मूल्य निर्धारित करणे कठीण आहे. इथे आम्ही आपल्याला मातृवाणीचे जुने अंक सादर करीत आहोत. ही ईश्वरीय वाणी आपल्या आत्मोन्नतीत साहाय्यक होवो अशी आम्ही प्रार्थना करतो.